Temple of Ghrishneshwar - घृष्णेश्वराचे मंदिर
सुमारे चारशेवर्षांपूर्वीची गोष्ट. वेरुळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत! पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटत. पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करणार? त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे. महादेवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे. हात जोडून आपल्या मनातले श्रीशिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडीमाणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आतबाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले. हे कोणी केले? कोण होते हे शिवभक्त ? ते होते मालोजीराजे भोसले.
हिंदवी स्वराज्य
हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे; मग ते कोणत्याही धर्माचे असोत, कोणत्याही जातीचे असोत. त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य
0 Comments