शिवरायांचे सहकारी
शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागात केली. मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग होय. मावळचा प्रदेश डोंगराळ, दर्याखोर्यांचा व दुर्गम. मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्यस्थापनेत केला. त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची व आपलेपणाची भावना निर्माण केली. स्वराज्यस्थापनेच्या या कार्यात त्यांना चांगले सवंगडी व सहकारी मिळाले. येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुद्गल, नऱ्हेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जिवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे हि त्यांतील काही नावे होत. या सहकार्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेचे कार्य हाती घेतले.
1 Comments
Aakankasha kailash Bagde
ReplyDelete