मुहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. या सरदारांचा प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. इ.स.१३४७ मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यातील 'गुलबर्गा' येथे आपली राजधानी स्थापन केली.
0 Comments