Historical Stream

Historical Stream

महमूद गावान

          महमूद गावान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली.                                                                                             महमूद गावाननंतर  बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतांतील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातून वर्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची पाच शकले झाली.

Post a Comment

0 Comments