![]() |
आहोमांशी संघर्ष |
इसवी सनाच्या तेराव्या शतकात शान जमातीचे लोक ब्रम्हपुत्रा नदीच्या खोर्यात स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोक या लोकांना आहोम असे म्हणत.औरंगजेबाच्या काळात आहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. मुघलांनी आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. गदाधरसिंह याच्या नेतृत्वाखाली आहोम संघटीत झाले. लाच्छित बडफूकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. आहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता द्रूढ करणे अशक्य झाले.
0 Comments